जगप्रसिध्द टॅग हेऊर्स कपंनीच्या महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष श्रेणीतील घड्याळांच्या उद्घाटनप्रसंगी बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने बॅटमिंटनपटू सायना नेहवालसाठी खास रोमॅन्टीक गाणे सादर केले.
आपापल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणा-या महिलांचा सन्मान करताना शाहरूखने अचानक रंगमंचावर रोमॅन्टीक गाणे सादर करून उपस्थितांना अचंबित केले. सारा पायलट, पिया सिंग, रितू बेरी आणि सायना नेहवाल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पिय़ा सिंगसाठी ‘ओ पिया पिया.. क्यू भूला दिया’, सारा पायलटसाठी ‘सारा जहा से अच्छा ये काम तुम्हारा’, ‘काली घटा छायी.. प्रेम रितू आयी.. आयी आयी आयी रितू याद तेरी आयी’ हे गाणं रितू बेरीसाठी शाहरूखने सादर केलं. ऑलिम्पिक पदकाची कमाई करणा-या सायना नेहवालसाठीही शाहरूखने ‘सायना बोलो बोलो.. तुमको मुझसे… मुझे तुमसे प्यार है’, हे गाणं सादर करून सायनाला आणि उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का दिला.

Story img Loader