बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान या वर्षी अभिनेता शाहिद कपूरबरोबर आयफ अवॉर्डसचे सूत्रसंचालन करणार आहे. या अधी शाहरूखने २००५ मध्ये आयफा-आयआयएफएचे सूत्रसंचालन केले होते. २००९ नंतर दुस-यांदा आयफाचे आयोजन मकाऊमध्ये होत असून, या समारंभात दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित आणि अभिषेक बच्चन नृत्य सादर करणार आहेत. अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा आणि श्रीदेवी यांच्यात नृत्याची जुगलबंदी रंगणार आहे. आयफा २०१३ चे आयोजन द वेनेटियन मकाऊमध्ये होणार असून मकाऊ सरकारचे पर्यटन कार्यालय यास मदत करणार आहे.

Story img Loader