बॉलीवूड बादशाह शाहरुख खान २०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्काराचे सूत्रसंचालन करणार आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील यशसंपादितांचा गौरव करणार आहे.
फोटो गॅलरीःफ्लॅश बॅक : स्क्रिन पारितोषिक वितरण सोहळ्यातील भावपूर्ण क्षण
शाहरुख खानने २०१० आणि २०११च्याही पुरस्काराचे सूत्रसंचालन केले होते. शाहरुख म्हणाला की, पुरस्कार सोहळ्यांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मला नेहमीच आनंद होतो. स्क्रीन पुरस्काराने दिलेल्या सूत्रसंचालनाच्या संधीमुळे मला चाहत्यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या आशीर्वादाची परतफे़ड करण्याची संधी मिळते. स्क्रीन पुरस्कार हा विश्वसनीय आणि सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, असेही तो म्हणाला.
‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी नामांकन
‘स्क्रीन पुरस्कार २०१४’चे वितरण १४ जानेवारीला होणार आहे.
स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग १

Story img Loader