पश्चिम बंगालचा ब्रॅण्ड अँम्बेसिडर म्हणून नियुक्त झालेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आता बंगाली भाषेचे धडे घेणार आहे. अभिनेत्री जया बच्चन यांच्याकडून तो बंगाली शिकणार असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान शाहरुनने आपली बंगाली शिकण्याचे इच्छा व्यक्त केली.
शाहरुख म्हणाला की, मी गेली तीन वर्षे इथे येत आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की पुढच्या वेळी मी येथे येईन तेव्हा बंगालीतूनच बोलेन. जेणेकरून, मी कोलकाताचाच असल्याचे जया आन्टींना वाटेल. त्यापूर्वी जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि कमल हसन हे मिथुन चक्रवर्ती आणि आपल्याप्रमाणे वास्तविकरित्या बंगाली नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आपण बंगाली शिकून, खरे बंगाली असल्याचे दाखवू आणि ही भाषा शिकण्यासाठी मी तुमच्याकडेच येईन, असे शाहरुख हा जया बच्चन यांना म्हणाला.

Story img Loader