फराह खानच्या चित्रपटात यापूर्वी शाहरूख खानच्या एट पॅक अॅब्सचे दर्शन घडले होते, सात वर्षानंतर खास तिच्यासाठी पुन्हा त्याने हा जादुई करिश्मा साकारला आहे. ‘हॅपी न्यू इयर’ या तिच्या आगामी चित्रपटात शाहरूखचे एट पॅक अॅब्स पाहायला मिळणार आहेत. ‘ओम शांती ओम’ चित्रपटात शाहरूखने ‘दर्द-ए-डिस्को’ या खास गाण्यात असा करिष्मा केला होता. ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटातील एका दृष्यात शाहरूच्या एट पॅक अॅब्सचे दर्शन होणार आहे. प्रशांत सावंत या आपल्या प्रशिक्षकाबरोबर शाहरूखने शरिरावर मेहनत घेत परिश्रमांची पराकाष्टा केली. गेल्या वीस वर्षापासून प्रशांत त्याचा प्रशिक्षक आहे. त्याचबरोबर आर्यन या आपल्या मोठ्या मुलाकडूनदेखील प्रेरणा मिळत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
परंतु, सार्वजनिकरित्या आपल्या शरीरयष्टीबाबत बोलताना बॉलिवूडच्या या सुपरस्टारला अवघडल्यासारखे वाटते. असे असले तरी, आपले हे अवघडलेपण बाजुला ठेवत शाहरूखने सोशल मिडियावर एट पॅक अॅब्स झळकावले आहेत. बॉलिवूडमधील प्रसिध्द छायाचित्रकार डब्बू रत्नानीने सदर छायाचित्र काढले आहे. दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात शाहरूखबरोबर दिपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सुध आणि विवान शहा यांच्यादेखील भूमिका आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा