‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या विजयाने भारावून गेलेल्या शाहरुख खानने आपल्या मनःशांतीसाठी  गौतम बुद्धांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आयपीएल स्पर्धेदरम्यान, कोलकाता संघातील उतार-चढाव अतिशय जवळून अनुभविले असल्याने सामन्यांदरम्यान संघाप्रती भरपूर उत्साही असायचो त्यामुळे आता मन:शांतीसाठी  गौतम बुद्धांची पुस्तके मदत करतील असे शाहरूखने म्हटले आहे.
‘आयपीएल’च्या या हंगामात उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर संघमालक शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत विजयी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी शाहरूखने मोठ्या जल्लोषात संघाप्रती आनंद व्यक्त केला. शाहरुख आता फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा