बॉलिवूडच्या ‘खान’दानातील एक खान अर्थातच शाहरुख खानच्या चाहत्यांना लवकरच त्याचे एक अनोखे रुप पाहायला मिळणार आहे. चित्रपटात शाहरुख एका पौराणिक योध्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या या नव्या रुपाबदद्दल चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडमध्येही उत्सुकता आहे. संपूर्ण चित्रपटात शाहरुख या अनोख्या पेहरावात वावरणार आहे.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक किंवा प्रमुख कलाकारही वेगवेगळ्या कल्पना लढवित असतात. त्याचा फायदा नक्कीच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होत असतो. शाहरुखच्या या अनोख्या रुपातील छायाचित्रे नुकतीच प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहेत. शाहरुख खानच्या ‘रा वन’ चित्रपटाबाबतही अशाच प्रकारे हवा तयार करण्यात आली होती. या आगामी चित्रपटातील शाहरुखच्या अनोख्या रुपातील व्हिडिओ सर्वत्र फिरत आहेत. ‘रा वन’नंतर शाहरुख पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘अथर्वा द ओरिजीन’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटात शाहरुख एक अ‍ॅनिमेटेड भूमिका साकार करत आहे. शाहरुख चित्रपटात एका पौराणिक भूमिकेत दिसणार असून या अनोख्या भूमिकेसाठी त्याने डोक्यावर शिंगे असलेला मुगुट परिधान केलेला आहे. शाहरुखच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर तयार झाला असून त्यामध्ये शाहरुखचे हे आगळे रुप पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा