दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या लाइगर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. अनेक चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या कथानकावरुन विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी विजय देवरकोंडाने बॉलिवूडचा किंग अशी ओळख असलेल्या शाहरुख खानबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

‘अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉमरेड’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता म्हणून विजय देवरकोंडाला ‘लायगर’ या चित्रपटाच्या माध्यमातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने शाहरुख खानबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यात त्याने शाहरुख खानने कशाप्रकारे त्याला सिनेसृष्टीत येण्यासाठी प्रोत्साहित केले याबाबतचा त्याने खुलासा केला आहे.
आणखी वाचा : Liger Movie Review : ना धड लायन, ना टायगर; जबरदस्ती जुळवून आणलेला अन् एक फिस्कटलेला प्रयोग म्हणजे ‘लाइगर’

GQ या वेबसाईटशी बोलताना विजय देवरकोंडा म्हणाला, “मला शाहरुखने माझ्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. जर तो ते करु शकत असेल तर मी का नाही? असा प्रश्न मी स्वत:ला केला होता. शाहरुखच्या एका विधानामळे मला खूप प्रेरणा मिळाली होती. मला माझे जुने दिवस आठवले. यात शाहरुख स्वत:ला शेवटचा सुपरस्टार म्हणाला होता.”

मी एकदा त्याची मुलाखत बघत होतो तेव्हा शाहरुख म्हणाला, “मी सर्वात शेवटचा सुपरस्टार आहे. त्यावेळी मी माझ्या मनात असे बोलत होतो की शाहरुख तू चुकीचा आहेस. तू शेवटचा सुपरस्टार नाही. मी लवकरच येतोय, असे मी म्हटले होते. यानंतरच मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.”

आणखी वाचा : “आपला धर्म…” ‘बॉयकॉट लाइगर’च्या ट्रेंडवर विजय देवरकोंडाचे स्पष्ट विधान

“शाहरुख खानला मी प्रेरणास्थान मानतो. जर तो सिनेसृष्टीतील कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय इथपर्यंत पोहोचू शकतो तर मी ही ते करु शकतो. त्यामुळे शाहरुख हा शेवटचा सुपरस्टार नाही, मी देखील याच रांगेत उभा आहे”, असे विजय देवरकोंडाने म्हटले

विजय देवरकोंडाचा लाइगर चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून यात विजय देवरकोंडा मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader