‘काय पो छे’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सुशांत सिंग राजपूत पाठोपाठ त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे हीदेखील चित्रपटसृष्टीत येण्याची शक्यता आहे. ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेद्वारे प्रसिद्ध असलेल्या अंकिताला चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे, फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात ही मराठी मुलगी शाहरुखसोबत रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे.
मकाऊमध्ये नुकताच पार पडलेल्या आयफा सोहळ्यावेळी शाहरुखने सुशांत सिंग राजपूतसोबत अंकिताला पाहिले. त्यावेळी तिची महाराष्ट्रीयन शैली चित्रपटातील भूमिकेसाठी चांगली राहील, असे शाहरुखला वाटले. मात्र, दिग्दर्शक फराह खानने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
चित्रपटात शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत दिसणा-या मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज, अभिषेक बच्चन आणि बूमन इरानी या सर्वांसमोर नृत्य स्पर्धेत भाग घेण्याची परिस्थिती येते. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री एका बार डान्सरच्या भूमिकेत दिसणार असून ती या सर्व मित्रांना नृत्य स्पर्धा जिंकण्यास मदत करते यावर चित्रपटाची कथा चित्रीत करण्यात येत आहे.

Story img Loader