शाहरूख खानचा अभिनय असलेला आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा ट्रेलर युट्युबवर केवळ चार दिवसांत २० लाखांपेक्षा जास्त वेळा बघितला गेला. रोहित शेट्टी दिग्दर्शित या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटात दीपिका पदुकोण दक्षिण भारतीय मुलीची भूमिका साकारत आहे. शाहरूख आणि दीपिकाने या आधी २००७ साली आलेला सुपरहीट चित्रपट ‘ओम शांति ओम’ मध्ये एकत्र काम केले होते. रोहित शेट्टीबरोबर त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
४७ वर्षीय शाहरूख खान या चित्रपटात राहुल नावाची व्यक्तिरेखा करत आहे, जे त्याचे मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि रेड चिलीज् एंटरटेनमेंटचा हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-06-2013 at 11:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans chennai express trailer crosses 2 million mark on youtube