शाहरुखच्या ‘दिवाना’ चित्रपटाचा रिमेक चित्रपट दिग्दर्शक गुड्डु धनोआ करणार आहे. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज कंवर तर निर्मिती गुड्डु धनोआ यांनी केली होती. चित्रपटात रिशी कपूर, शाहरुख खान आणि दिव्या भारती यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.
धनोआ म्हणाले की, आम्ही एक रोमॅन्टिक चित्रपट बनवत असून त्याची कथा पूर्णपणे वेगळी असणार आहे. आम्ही चित्रपटासाठी ‘दिवाना’ हे शीर्षक वापरत आहोत पण त्यात थोडा बदल केला जाईल. हा चित्रपट भट यांच्या ‘मर्डर’, ‘जन्नत’ चित्रपटांसारखा असणार आहे. चित्रपटाची कथा तयार असून त्यासाठी योग्य कलाकारांचा शोध चालू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा