रेड चिलीज एन्टरटेन्मेंन्टची प्रस्तुती असलेल्या ‘हॅप्पी न्यू ईयर’ चित्रपटाने जगभरात ३५० कोटींची कमाई केल्यानंतर त्याला आणखी एक आनंदाचे कारण मिळाले आहे. फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू ईयर’ हा चित्रपट ‘ऑस्कर लायब्ररी’त गेला आहे. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स’च्या संग्रहालयाने या चित्रपटाच्या पटकथेस कायमस्वरुपी संग्रहित करण्यासाठी त्याची अधिकृत निवड केली आहे.
विद्यार्थी, दिग्दर्शक, लेखक, कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या व्यक्तींना अभ्यास करण्याकरिता ऑस्कर लायब्ररीमध्ये चित्रपटांचा समावेश केला जातो. १९१० सालापासून आत्तापर्यंत या लायब्ररीत ११ हजारांपेक्षाही जास्त चित्रपटांचा आणि कथांचा समावेश आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेला ‘हॅप्पी न्यू ईयर’ची चौथ्या आठवड्यातही तिकीट बारीवर जोरदार कमाई करत आहे.

Story img Loader