शाहरुख खान अभिनीत आगामी ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. चित्रपट अगदी भव्य-दिव्य व्हावा आणि त्यात कसलीही कसर राहू नये, यासाठी दुबईतील चित्रीकरणावर ५० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे ८० ते ९० टक्के चित्रिकरण दुबईत करण्यात येणार आहे.
दुबईच्या चित्रपट आयोगाकडूनच खर्चाचा हा आकडा स्पष्ट करण्यात आला आहे. हॅपी न्यू इयर चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यामुळे  हॉटेल रूम, विमान, स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ इत्यादींना काही प्रमाणात रोजगारदेखील मिळणार आहे. तो फायदा महत्त्वाचा आहे.पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
देशाच्या चित्रपट आयोगाला त्यामुळे बॉलीवूडच्या इतर प्रस्तावांतही रस निर्माण झाला आहे. म्हणूनच बॉलीवूडचे आणखी दोन चित्रपट देशात चित्रित केले जाणार आहेत. मात्र, याबाबत त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही.

Story img Loader