बॉलिवूडचा किंगखान शाहरूख आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आर्यन व सुहाना या मुलांसह सहलीला गेला होता. बल्गेरीया येथे शाहरूखने अजय देवगनची भेट घेत दोघांनी एकत्र जेवण केले होते. त्यानंतर शाहरूख अमेरिकेतील लॉसअँजलीस येथे गेला मोन्टेज हॉटेल येथे त्याने आपल्या मुलांसह वेळ घालवला, व या हॉटेलचे ट्विटरवरून आभारही मानले. मुलांसोबत केलेल्या या सहलीमधून आपल्याला बरेचकाही शिकायला मिळाले असेही त्याने म्हटले आहे.

शाहरूख आपल्या अगमी चित्रपटांच्या चित्रिकरणात प्रचंड व्यस्त आहे. त्याचा फॅन नावाच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असून यादरम्यान शाहरूखच्या मन्नत बंगल्याच्या भिंतीवर ग्राफीटी काढणा-या चाहत्याबद्दलही त्याने सांगतिले. फॅन हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. फॅन प्रेक्षकांच्या भेटील एप्रिल २०१६ मध्ये येणार असून दिलवाले हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर, सुलतान हा चित्रपट ईद दरम्यान २०१६ साली प्रदर्शित होणार असून सलमानच्या चित्रपटाशी टक्कर घेत आहे.

Story img Loader