सोशल मिडियाचे मायाजाळ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा जसा चांगला उपयोग करता येतो तसाच त्याचा गैरउपयोगही केला जातो. एमएमएस स्कॅन्डल, सायबर क्राइम यांसारख्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहावयास मिळतेय. यांना ज्याप्रमाणे सामान्य माणूस बळी पडतोय त्याचप्रमाणे यापासून सेलिब्रेटीही वंचित राहिलेले नाहीत. याचेच ताजे उदाहरण म्हणजे सध्या चर्चेत असलेला नव्या नवेली आणि आर्यन यांचा व्हिडिओ.
गेले काही दिवस सोशल मिडियावर एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओत एक मुलगा आणि मुलगी आक्षेपार्ह स्थितीत दाखविण्यात आले आहेत. यात दाखविण्यात आलेली मुले ही बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन हे आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही आक्षेपार्ह स्थितीत दाखविण्यात आली आहेत. मात्र, हा व्हिडिओ कितपत खरा की खोटा याची शहानिशा अद्याप झालेली नाही.
एमएमएस स्कॅन्डलमध्ये अडकली अमिताभची नात आणि शाहरुखचा मुलगा
एमएमएस स्कॅन्डल, सायबर क्राइम यांसारख्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहावयास मिळतेय.
First published on: 06-10-2014 at 03:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans son and amitabh bachchans granddaughters mms video