बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान हा बॉलीवूडमधला सर्वाधिक प्रसिद्ध खान बनला आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर ८ दशलक्ष फोलोअर्सचा टप्पा त्याने पार केला. शाहरुखची ट्विटरवरील फोलोअर्सची संख्या ८ दशलक्षाच्यावर पोहोचलेली असतानाच सलमान आणि आमिरच्या फोलोअर्सचा आकडा ७.१७ दशलक्षच्या आसपास आहे.
सलमान आणि आमिरच्या तुलनेने शाहरुख हा ट्विटवर जास्त अॅक्टिव असतो. तो शक्यतो दररोज ट्विट करत असून आपल्या खासगी आयुष्यातील एक तरी फोटो  ट्विटवर पोस्ट करतो. आपल्या मुलांसोबत घालवलेल्या मजेशीर क्षणांबाबतही तो त्यावर शेअर करतो. तर दुसरीकडे, इतर दोन खान हे कमी ट्विट करत असून केवळ त्यांचे आगामी चित्रपट येण्याच्या वेळेसच सोशल मिडियावर पाहावयास मिळतात. मात्र, शाहरुख अद्याप बॉलीवूड शहेनशहा यांना ट्विटरवर मागे टाकू शकलेला नाही. अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटवर ९ दशलक्ष फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहाजणांमध्ये शाहरुखने हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझला मागे टाकले. आणि आता जेव्हा ट्विटरवर सर्वाधिक प्रसिद्धीची वेळ आली तेव्हाही या बॉलीवूड बादशाहाने टॉम क्रुझला मागे टाकले. टॉम क्रुझचे ट्विटरवर ४.४९ दशलक्ष फोलोअर्स आहेत.

Story img Loader