‘शानदार’ या आगामी चित्रपटात शाहिद कपूर आणि आलिया भट पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यामुळे ‘शानदार’ची वर्षभरातल्या बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत गणना होते आहे. शाहिदचे चाहते चित्रपटाच्या ‘फर्स्ट लूक’ विषयी टि्वटरवरून सतत विचारणा करीत होते. चाहत्यांच्या आग्रहाला मान देत शाहिद कपूर, आलिया भट, करण जोहर आणि अपूर्व मेहताने आपल्या टि्वटर खात्यावरून ‘शानदार’च्या ‘फर्स्ट लूक’चा टीझर प्रसिद्ध केला. टीझरमध्ये शाहिद आणि आलिया एका बेंचवर हातात हात घालून झोपलेले नजरेस पडतात. त्याचबरोबर ‘…and they wake up tomorrow ‘अशी इंग्रजीतील ओळ देखील दिसून येते. ‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहेलने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, २२ ऑक्टोबर रोजी ‘शानदार’ चित्रपटगृहात झळकणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा