शाहिद कपूर आणि आलिया भट यांच्या आगामी ‘शानदार’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. अमित त्रिवेदीचे संगीत असलेले ‘गुलाबो जरा इतर गिरा तो’ हे गाणे आपल्याला थिरकायला भाग पाडते. त्यावर शाहिद आणि आलियाचा डान्स तर चारचाँद लावून गेला आहे.
यात शाहिदने जगजिंदर जोगिंदर या दिमाखदार वेडिंग प्लॅनरची तर आलियाने आलियाचं नावाने सेलिब्रिटी डान्स पार्टी आयोजन करणा-या मुलीची भूमिका बजावली आहे. बॅचलर पार्टीसाठी साजेसे असे हे गाणे आहे. विशेष म्हणजे यात शाहिदची बहिण सनाह काम करतेयं. चुलबुली सनाह आपल्या अंदाजाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेण्यास यशस्वी ठरली आहे. सनाही ही शाहिदची सावत्र मुलगी असून, ती पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे.

Story img Loader