बॉलिवूड सेलिब्रेटींचे मुलखतीत किंवा चित्रपटांच्या सेटवर होणारे वाद काही नवे नाहीत. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांचे त्यांच्या सहकलाकरांसह झालेले वाद बरेचदा चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा त्यांची भांडणं कॅमेऱ्यात कैद होतात आणि मग हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही काहीसं असंच झालं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि शाहिद कपूर यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ‘बदमाश कंपनी’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी या दोघांमध्ये जोरदार भांडण होतं.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बदमाश कंपनी’ चित्रपटात अनुष्का शर्मा आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने तुफान कमाई केली होती. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या मुलाखतीच्या एका सेगमेंटमध्ये शाहिद आणि अनुष्का यांच्यात जोरदार वाद झाला होता. शाहिद कपूरने नव्या कलाकारांसोबत काम करण्यावर त्याचं मत मांडल्यानंतर दोघंही एकमेकांना भिडले होते.
आणखी वाचा- “चित्रपट पूर्ण करण्याच्या नादात आजारपण…” ‘केजीएफ’ फेम कॅन्सरग्रस्त अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहिद कपूरला, ‘नव्या कलाकारांसोबत काम करणं आव्हानात्मक आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. ज्यावर शाहिद उत्तरतो, “जेव्हा तुम्ही नव्या कलाकारांसह काम करत असता तेव्हा तो खूपच वेगळा अनुभव असतो. हे खूप कठीण असतं. अनेकदा त्यांना त्या झोनमध्ये यायला वेळ लागतो.” यावर त्याच्या बाजूला बसलेली अनुष्का त्याला मध्येच थांबवत म्हणते, “कोण आहेत ते? नाव घेऊन सांगा बरं.” यावर शाहिद काहीशा चिडलेल्या स्वरात तिला म्हणतो, “तू कुठले ५० चित्रपट केले आहेस?”

आणखी वाचा-मिया, बिवी और वो…! ‘या’ गोष्टीवरुन रात्रभर होतात शाहिद कपूर आणि मीराची भांडणं

Guys, Shahid wanted to bitch-slap a co-star that was also a co-star of KJo. That's Anushka. She was KJo's co-star in Bombay Omelette . And here is their camaraderie [Credit: u/goldenage3456]
byu/just-slaying inBollyBlindsNGossip

शाहिदचं बोलणं ऐकून त्यांचे सहकलाकार वीर दास आणि मेयांग चांग हे सुद्धा हैराण होतात. त्यानंतरही शाहिद आणि अनुष्का यांच्यात जोरदार वाद होतो. शाहिद अनुष्काला सुनावतो, “तू का मध्ये पडतेयस. दोन लोकांच्या बोलण्यात बोलण्याची गरज नाही. मी चांगशी बोलत आहे. तुझ्याशी बोलत नाहीये.” हे ऐकल्यानंतर अनुष्का भडकते आणि शाहिदला ‘गप्प बस’ असं बोलते. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

Story img Loader