बॉलीवूडच्या पुरस्कार सोहळ्यांचा हंगाम आता सुरु झाला आहे. नुकताच लक्स गोल्डन रोज पुरस्कार सोहळा रिलायन्स स्टुडिओजमध्ये पार पडला. बॉलीवूडमधील सुंदरी आणि त्यांचे बहारदार परफॉर्मन्स यांनी पुरस्कार सोहळ्याला चारचाँद लावले. करिना कपूर खान, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, श्रीदेवी, आदिती राव हैदरी, माधुरी या सौंदर्यवतींसह अभिनेत्यांमध्ये शाहिद कपूर, शाहरुख खान, हृतिक रोशन, अर्जुन कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांनीही उपस्थिती लावली होती.

एका छताखाली इतके कलाकार आले असताना तिथे काहीच घडणार नाही असे कसे होईल? तर बॅकस्टेज मागे घडलेली एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. तर झाले असे की, शाहिद कपूर त्याच्या परफॉर्मन्ससाठी स्टेजमागे वाट पाहत होता. त्याचवेळी लाल रंगाचा सुंदर गाउन परिधान केलेली करिना वॉशरुममध्ये जाण्यासाठी त्याबाजूला आली. हे दोघेही पूर्वाश्रमीचे प्रियकर होते हे सर्वांनाच माहित आहे. सहसा, आपल्या आधीच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला पाहिल्यावर समोरची व्यक्ती काही हावभाव दाखवत नाही. पण, यावेळी काही वेगळेच पाहावयास मिळाले. हे दोघं एकमेकांच्या समोर येताच त्यांनी मिठी मारत एकमेकांचे अभिनंदन केले. शाहिदने करिनाचे अभिनंदन करत तिच्या येणा-या बाळासाठी खूप सा-या शुभेच्छा दिल्या. तर करिनाने आपल्या ‘उडता पंजाब’ सहकलाकार नुकत्याच झालेल्या त्याच्या मुलीसाठी अभिनंदन केले.

करिना आणि शाहिद कपूर यांच्यात तब्बल तीन वर्षे प्रेमसंबंध होते. २००७ साली त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेक अपनंतर या दोघांनीही एकमेकांपासून नेहमीच अंतर ठेवणे पसंत केले. ते एकमेकांच्या समोर येणं टाळायचे. तसेच, एकमेकांच्या वाटेत आपण येणार नाही याची दोघही काळजी घ्यायचे. त्यानंतर, तब्बल नऊ वर्षांनी शाहिद-करिना हे त्यांच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी एकाच मंचावर दिसले. या चित्रपटात दोघांनी काम केले असले तरी त्यांनी एकही दृश्य एकत्र केलेले नाही. या दोघांमधील तणाव तेव्हा दिसून येत होता. पण करिनाने पुढाकार घेत यावर मौन सोडायचे ठरवले. त्यानंतर दोघांनीही चित्रपटाविषयी आणि एकमेकांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी भाष्य केले.

Story img Loader