बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरच्या करिअरला कलाटणी मिळवून देणाऱया ‘कमिने’ चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे निश्चित झाले आहे. ‘कमिने’चे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासोबत शाहिदने नुकताच ‘हैदर’ हा चित्रपट केला. ‘हैदर’ चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होतोय. आता शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज ही जोडी आता पुन्हा तिसऱयांदा एकत्र येऊन ‘कमिने २’ साकारणार आहेत.
‘कमिने’ चित्रपटासाठी चित्रपटरसिकांनी शाहिदचा अभिनय आणि भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाला दाद दिली होती. त्यामुळे ‘कमिने २’ची चर्चा दिवसेंदिवस रंगली होती त्यावर आता खुद्द शाहिदनेच शिक्कामोर्तब केले आहे. ‘कमिने २’ची कथा भारद्वाज यांच्याकडे तयार असून ‘हैदर’च्या प्रदर्शनानंतर आम्ही ‘कमिने २’च्या कामाला सुरुवात करणार आहोत, असेही शाहिद म्हणाला. तसेच कमिने चित्रपटाताली ‘ढँन टॅ नॅन’ हे सुप्रसिद्ध क्लब नंबर गाणे या चित्रपटाच्या सिक्विलमध्येही कायम राहणार असून त्याला रोमॅण्टीक मुलामा देऊन सादर करण्याचा मानस असल्याचेही शाहिद म्हणाला.

Story img Loader