एकटे असणे हे काही कमी आव्हानात्मक नसल्याचे अभिनेता शाहिद कपूरचे मानणे आहे. शाहिद म्हणाला, एकटा असण्याची काही आव्हाने आहेत. अशावेळी ज्या मुलीला तुम्ही भेटता त्या प्रत्येक मुलीशी तुमचे नाव जोडले जाते. करीना कपूरपासून विभक्त झालेल्या शाहिदचे नाव नर्गिस फाखरी, बिपाशा बसू, अनुष्का शर्मा आणि अलीकडच्या काळात हुमा कुरेशी या अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. या सर्व कथा कशा घडविल्या जातात, याचा आपल्याला अंदाज नसल्याचे शाहिद म्हणाला. हुमाला फक्त दोनच वेळा आपण भेटलो असल्याचे देखील त्याने सांगितले.

Story img Loader