बॉलीवूडचा ‘मोस्ट एलिजीबल बॅचलर’ असलेला शाहिद कपूर बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी शाहिदने ग्रीसला जाण्याचे ठरवले होते. मात्र, कामात व्यस्त असलेल्या शाहिदला त्याची बॅचलर ट्रीप रद्द करावी लागली.
हिंदुस्तान समाचारमधील वृत्तानुसार, शाहिद कामात व्यस्त असल्यामुळे त्याच्या जवळच्या मित्रांनी ठेवलेली बॅचलर पार्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, निराश झालेल्या आपल्या मित्रांना वर्षाअखेर ट्रीपला जाण्यास शाहिदने पटवलेय. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात दिल्लीत शाहिद आणि मीरा लग्नगाठीत बांधले जातील.
झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोद्वारे शाहिद छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याचसोबत आगामी शानदार चित्रपटातही तो झळकणार आहे.

Story img Loader