गेले काही दिवस शाहिद कपूर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. अखेर, यावर शाहिदने आपले मौन सोडले असून या वर्षाअखेरीस आपण विवाह करू असे त्याने म्हटले आहे.
गुरुवारी मुंबईत झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला असता तो म्हणाला की, मीरासोबत माझा साखरपुडा झालेला नाही. पण, गेले काही दिवस तुम्ही जे काही ऐकत आहात ते काही प्रमाणात खरं आहे. कारण, यावर्षाअखेर मी लग्न करेन, याक्षणी तरी मी तुम्हाला इतकेच सांगू शकतो. करिना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणांमुळे गाजलेला शाहिद दिल्लीस्थित मीरा राजपूतसह लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सुरु होती. मात्र, यावेळी शाहिदने आपले मौन सोडले. तसेच, पुढे त्याने हे आपले वैयक्तिक आयुष्य आहे असे म्हणत  आपल्या भावी पत्नीविषयी अधिक माहिती टाळले.

Story img Loader