बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर याने त्याच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाहिद कपूरने स्वत: आपली पत्नी मीरा गर्भवती असल्याचे सांगत चाहत्यांना गोड बातमी दिली.
नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये मीरा राजपूतने रॅम्पवॉक केले. यावेळी मीराने मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर तिने परिधान केला होता. मसाबा हिने रॅम्पवरील मीराचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर शाहिद आणि मीराच्या घरी नवी पाहुणा येणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगली होती. अखेर आज शाहिदने या गोड बातमीवर शिक्कामोर्तब केले.
सुरूवातीला प्रसारमाध्यामांनी शाहिदला तू भविष्यात वडिलपणाच्या अनुभवासाठी कितपत तयार आहेस, असा प्रश्न विचारला. त्यावर शाहिद म्हणाला की, तुम्ही असे आडून आडून प्रश्न काय विचारता?. यानंतर त्याला थेट प्रश्न विचारला असता त्याने होय मी बाप होणार आहे, अशी कबुली दिली. शाहिद आणि मीरा गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.

Story img Loader