विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या काश्मिरच्या खोऱ्यात सुरू आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि इरफान खान प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रीकरणावेळी शाहिद कपूर आणि इरफान खानवर आगीच्या निखाऱ्यांनी भरलेले भांडे फेकून हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शुटिंग पाहाण्यासाठी जमलेल्या गर्दीतून एका युवकाने आगीच्या निखाऱ्यांनी भरलेले भांडे शाहिद आणि इरफानच्या दिशेने फेकले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि उर्वरित चित्रीकरण व्यवस्थितपणे पार पडले. चित्रीकरणाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रीकरण सुरू असताना शाहिद आणि इरफान एका मोटारीच्या दिशेने जात होते, तेवढ्यात अचानक गर्दीतून कोणीतरी आगीच्या निखाऱ्यांनी भरलेले भांडे शाहिद आणि इरफानच्या दिशेने फेकले. हे भांडे इरफानवर आदळले आणि गरम राख शाहिदच्या आंगवर उडाली.
चित्रपटाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील अपहरणाचे दृष्य चित्रीत होत असताना ही घटना घडली. यानंतर, चित्रीकरण बघायला आलेल्या सर्वांनी त्या ठिकाणाहून पळण्यास सुरूवात केली. या विषयी पोलीस अधीक्षकांना संपर्क साधला असता त्यानी या घटनेचे खंडन केले. ते म्हणाले, तेथे प्रचंड गर्दी जमली होती. गर्दीतील युवक अभिनेत्यांना स्वाक्षरी देण्यासाठी सांगत होते. जेव्हा पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा गर्दीतील एक युवक त्याने आणलेल्या आगीच्या निखाऱ्यांनी भरलेल्या भांड्यासह घसरून पडला. नंतर चित्रीकरणात व्यवस्थित पार पडल्याचे देखील ते म्हणाले.
मागील वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काश्मीर विद्यापीठात चित्रपटातील दृष्याचा भाग म्हणून भारताचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला होता. परंतु, विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने चित्रिकरण बंद करावे लागले होते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
काश्मीरमध्ये ‘हैदर’च्या चित्रीकरणावेळी शाहिद कपूर आणि इरफान खानवर हल्ला
विशाल भारद्वाजच्या 'हैदर' चित्रपटाचे चित्रीकरण सध्या काश्मिरच्या खोऱ्यात सुरू आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि इरफान खान प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रीकरणावेळी शाहिद कपूर आणि इरफान खानवर आगीच्या निखाऱ्यांनी...
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-01-2014 at 02:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor irrfan attacked while shooting for haider in kashmir