बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांना कपल गोल्स देण्याची एकही संधी हे दोघं सोडत नाही. दोघंही एकमेकांसोबतचे व्हिडीओ शेअर करतात आणि एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट देखील करताना दिसतात. त्यांचं हे बॉन्डिंग पाहून चाहतेही खुश होतात. पण अनेकदा हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली देखील उडवताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. मीरा राजपूतनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट करत शाहिदनं तिची खिल्ली उडवली आहे.

मीरा राजपूतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये मीरानं मेकअप केलेला दिसत आहे. मीरानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय की तिला या गोष्टीचा अभिमान वाटतो की, तिला जसा मेकअप करायचा होता तसा ती करू शकली. आपल्या या मेकअपचं सीक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. आपला फोटो शेअर करताना तिने लिहिलं, “नो फिल्टर मेकअप माझ्याकडून, अनेक वर्षांनंतर मी माझे मेकअप प्रॉडक्ट बदलले. मी यांच्या प्रेमात आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला कसे वाटले.”

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

आणखी वाचा- “शाहिद कित्येक वेळा रात्री…”, पत्नी मीराने उघड केले बेडरुम सिक्रेट

मीराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण अभिनेता शाहिद कपूरनं मात्र आपल्या पत्नीलाच सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. शाहिद कपूरनं मीराच्या पोस्टवर कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. त्याने लिहिलं, “ती एवढी खुश होती की, तिला बाथरुममधून बाहेर पडेपर्यंतही वाट पाहता आली नाही.” शाहिदच्या या कमेंटला मीराने रिप्लाय दिला आहे. तिने लिहिलं, “तुला हा मेसेज इनबॉक्समध्ये करायचा होता का? जो तू इथे कमेंटमध्ये चुकून पोस्ट केला आहेस.” आपल्या या कमेंटमध्ये तिने शाहिदचा भाऊ इशान खट्टरला देखील टॅग केलं आहे.

मीरा राजपूतची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. खासकरुन मीरा शाहिदच्या या संभाषणाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अनेकांनी या दोघांच्या संभाषणावर कमेंट केल्या आहेत. दरम्यान शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘जर्सी’ चित्रपटात दिसला होता. हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूरची मुख्य भूमिका होती.

Story img Loader