अभिनेता शाहिद कपूरने त्याची पत्नी मीराला वेळ देता यावा, यासाठी टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात शाहिदची परीक्षक म्हणून वर्णी लागली होती. त्यानंतर काही दिवसांतच शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. मात्र, आता चित्रपट आणि ‘झलक दिखला जा’च्या व्यस्त वेळापत्रकामुळे शाहिदला मीरासाठी आजिबात वेळ द्यायला जमत नाही. काही दिवसांपूर्वीच मीरावर डिनरसाठी हॉटेलमध्ये एकट्यानेच जाण्याची वेळ आली होती. या सततच्या तडजोडींमुळे शाहीद हा शो सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. शाहीद आणि मीराच्या लग्नाला अवघे काही दिवसच झाले आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करावासा वाटत आहे. जेणेकरून, आगामी चित्रपटांच्या तारखा निश्चित होण्यापूर्वी मीराबरोबर काही क्षण घालवता येतील, असा शाहिदचा विचार आहे. सध्या शाहिद कपूरच्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. शाहिदने याअगोरच चित्रपटासाठी तारखा दिल्याने या दोघांना लग्नानंतर मधुचंद्रालाही जाता आले नव्हते.

Story img Loader