‘कमिने’ चित्रपटाद्वारे एकत्र आलेल्या शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रामधील जवळीक वाढल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध रुजण्यास सुरुवात झाली. परंतु, काही काळाने त्यांच्यातील प्रेमसंबंधाना तडा जाऊन ते एकमेकांपासून दुरावले. आता सर्व काही ठीक झाल्यास शाहिद कपूर आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इश्किया’चे दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी ‘उडता पंजाब’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी शाहीद कपूरला करारबध्द केले असून, चित्रपटातील स्त्री पात्रासाठी त्यांनी प्रियांका चोप्राशी संपर्क साधला आहे. शाहिद आणि प्रियांकामधील प्रेमसंबंध जगजाहीर होते, परंतु काही कारणाने ते एकमेकांपासून दूर गेले. एकमेकांपासून दुरावलेल्या या प्रेमीयुगलाला मोठ्या पडद्यावर एकमेकांबरोबर काम करताना पाहाणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे.

Story img Loader