बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर ‘हैदर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाकरिता काश्मीरला परतत आहे. ‘काश्मीर युनिव्हर्सिटी स्टुडण्ट्स युनियन’च्या विद्यार्थ्यांनी दांडगाई करीत चित्रपटाचे काम यापूर्वी उधळून लावले होते. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, ‘हैदर’ची सर्व तुकडी चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे.
३२ वर्षीय शाहिदने ट्विटरवर चित्रीकरणासाठी काश्मीरला जात असल्याचे ट्विट केले आहे. ‘हैदर’ या चित्रपटात शाहीद कपूर, इरफान खान आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट शेक्सपिअरच्या हेम्लेट या नाटकावर आधारित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor returning to kashmir to finish haider