मी करिनासोबत जाणीवपूर्वक छायाचित्र काढून घेत नाही, असा गौप्यस्फोट अभिनेता शाहिद कपूर याने केला आहे. शाहिद आणि करिना कपूर आगामी ‘उडता पंजाब’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी झालेल्या कार्यक्रमात शाहिद आणि करिना एकमेकांसोबत अवघडलेपणाने वावरत होते. यावेळी व्यासपीठावर चित्रपटाची संपूर्ण टीमदेखील हजर होती. यावेळी शाहिद करिनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता. व्यासपीठावरही आलिया भट पूर्णवेळ या दोघांच्यामध्ये उभी होती. याशिवाय, करिना आणि शाहिद यांनी एकमेकांसोबत छायाचित्रे काढून घेतानाही आलियाला सोबत ठेवले होते.
‘जे घडलेच नाही त्याबद्दल काय बोलायचे’; पत्रकारांच्या प्रश्नांना शाहिद -करिनाची भन्नाट उत्तरे
रेडिओवर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात शाहिदला याबद्दल विचारण्यात आल्यानंतर शाहिदने याबाबतचा खुलासा केला. दोन लोकांना एकमेकांसोबत अवघडलेपण वाटते, हे तुम्ही कसे काय ठरवता? आम्ही एकमेकांकडे विशिष्टप्रकारे बघत होतो का, तुम्हाला त्यावेळी नक्की काय वेगळे वाटले, असे सवाल त्याने उपस्थित केले. मात्र, तू आणि करिना एकमेकांपासून अंतर राखून होतात, असे सांगितल्यावर शाहिद म्हणाला की, तेव्हा मी आणि करिनाने एकत्र छायाचित्र काढले असते तर प्रसारमाध्यमांनी त्याविषयी चर्चा सुरू केली असती. त्यामुळे मी करिनासोबत छायाचित्र काढणे जाणीवपूर्वक टाळले, असे शाहिदने सांगितले.

shahidkapoor-kareenakapoor759

Story img Loader