‘किसिंग बॉय’ बरोबरच ‘लव्हर बॉय’ अशी प्रतिमा असलेला बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर याने आपण आता पडद्यावर चुंबनदृश्य देणार नसल्याचे जाहीर केले आहे. अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन असलेल्या शाहीदचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. लग्नानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे.
शाहीद कपूर व आलिया भट्टचा ‘शानदार’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शाहीदने ‘नो किसिंग सीन’ असे जाहीर केले. मी आणि सहकलाकार यांचे पडद्यावरील चुंबनदृश्य किंवा प्रेमप्रसंग पाहताना आपली बायको मीरा हिला अवघडल्यासारखे वाटू शकते. तिला असे वाटू नये यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे शाहीदने सांगितले. लग्नानंतर आपलीही जबाबदारी वाढते आणि मी पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार झालो आहे. मीरा ही चित्रपटसृष्टीतली नसल्यामुळे एक चांगले आहे की त्यामुळे घरातील वातावरण चांगले व हलकेफुलके राहते, असेही शाहीद म्हणाला. ती या क्षेत्रातली नसल्याने तिचा वावर हा अन्य कोणत्याही घरातील सर्वसामान्य व्यक्तीसारखाच असतो. मला तिच्याशी चित्रपटाविषयीच्याच गप्पा माराव्या लागत नाहीत. त्यामुळे चित्रीकरण पूर्ण करून घरी परतल्यानंतर आपल्या माणसांमध्ये आल्याची, निदान घरात तरी सर्वसामान्य जीवन जगता येईल, ही भावना सुखावणारी असल्याचे शाहीदने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा