बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कायमच कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. शाहीद आणि मीराचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच शाहिदने मीरासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

शाहिद कपूरने मीराच्या नकळत एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत शाहिद आणि मीरा एका बाकाच्या दोन्ही टोकाला बसल्याचे दिसत आहेत. यात एका बाजूला शाहिद हा तिचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला मीरा ही तिच्या फोनमध्ये गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान शाहिद हा व्हिडीओ बनवत असल्याचा अजिबात मीराला अंदाज नाही. त्यामुळे तो दुरुनच तिच्या कपाळावर किस करत असल्याचे दिसत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

शाहिदने काही तासांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शाहिदने रोमँटिक कॅप्शन दिले आहे. तिचे पहिले प्रेम ज्याकडे ती पाहत आहे. पण तिचे दुसरे प्रेम मी असल्याने ठीक आहे… काय करायचं…, प्रेम असंच असतं.. अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे. त्यासोबत त्याने दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

दरम्यान शाहिदने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मीराने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने शाहिदच्या पहिल्या प्रेमाबद्दलाच दावा खोडून काढला आहे. “नाही तू माझे पहिले प्रेम आहेस” अशी कमेंट करत तिने हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या दोघांच्या या रोमँटिक व्हिडीओवर अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याने ६ वर्षाचा असताना केले होते जुही चावलाला प्रपोज, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका असलेला ‘जर्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर हा चित्रपट उद्या म्हणजेच ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूरचे वडील पंकज कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader