आपल्या चित्रपटांसाठी शाहिद कपूर त्याच्या लूकमध्ये नेहमीच काहीनाकाही बदल करत असतो. यावेळी त्याने आपल्या आगामी चित्रपटाकरिता खांद्यापर्यंत केस वाढविले आहेत. त्याच्या या नव्या लूकमधील हा बोल्ड सेल्फी त्याने प्रसिद्ध केला असून त्यास कमिंग सून असे कॅप्शन दिले आहे.

आराशासमोर उभं राहून शाहिदने काढलेल्या या फोटोत त्याचे केस वाढलेले दिसतात. तसेच, त्याची पिळदार शरीरयष्टी यात लक्ष वेधून घेते. शाहिदचा हा लूक त्याच्या आगामी उडता पंजाब चित्रपटासाठी असल्याचे कळते. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भटदेखील झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा