बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर येत्या जून महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी खुद्ध शाहिदनेच एका कार्यक्रमात या वर्षाअखेरीस लग्न करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, जून महिन्यातच विवाह उरकण्याचे आता शाहिदने ठरवल्याचे समजते. दिल्लीस्थित मीरा राजपूत या तरुणीशी शाहिदचे शुभमंगल पक्के झाले आहे. एका इंग्रजीवृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शाहिदने आपल्या आगामी चित्रपट ‘फर्जी’च्या दिग्दर्शकांना जूनमध्ये चित्रीकरण सुरू करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. फर्जीचे दिग्दर्शक राज निदिमोरू यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, “हो फर्जीचे चित्रीकरण नक्कीच ठरलेल्या वेळेच्या उशीराने सुरू होणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या स्क्रिप्टचा अंतिम मसुदा पूर्ण झाला आहे. शाहिद, क्रिती सनोन आणि नवाजुद्दिन सिद्दिकी यांना चित्रपटाची पूर्ण कथेची माहिती दिली असून जूनमध्येच चित्रीकरणाला सुरूवात होणे अपेक्षित होते. मात्र, शाहिद विवाह करत असल्याच्या सरप्राईजमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. जूनमध्ये शाहिद विवाह करत असल्यामुळे आता आम्हाला चित्रीकरणाचे वेळापत्रक नव्याने तयार करावे लागणार आहे.” 

Story img Loader