विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’नंतर अभिनेता शाहीद कपूर आता राज निदीमोरू आणि डी.के. कृष्णा यांच्या आगामी ‘फेक’ चित्रपटात एका ठकसेनाची भूमिका साकारताना दिसेल. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी शाहीदची निवड झाली असली तरी, ‘फेक’मधील इतर कलाकारांची आणि नायिकेची निवड होणे अद्याप बाकी आहे. या चित्रपटाचे कथानक मोठ्या पातळीवरील आर्थिक फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाज व्यक्तिरेखेभोवती फिरणारे असून, हा घोटाळेबाज नंतर कायद्याच्या कचाट्यात कसा सापडतो हे फेक’ या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader