shahidkapoor-homeबॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरच्या लग्नाची चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. लवकरच शाहिद आणि मिरा राजपूत लग्नबंधनात अडकणार आहेत. मंगळवार, ७ जुलै रोजी संपन्न होत असलेल्या या लग्नाचे सर्व विधी छत्तरपूर इथल्या फार्म हाऊसवर पार पडतील. त्यानंतर नवी दिल्लीमधील ओबेरॉय हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नानिमित्त आज संध्याकाळी संपन्न होणाऱ्या संगीत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शाहिद मुंबईहून दिल्लीला रवाना झाला. दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या शाहिदला छायाचित्रकारांनी कॅमेराबद्ध केले. यावेळी शाहिदने प्रिंटेड शर्ट आणि जीन्स असा पोशाख परिधान केला होता. या आनंदाच्या क्षणी शाहिदची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी विमानतळावर एकच गर्दी केली होती. परंतु, शाहिदने त्यांच्याशी संवाद साधण्याचे टाळले. शाहिदचे वडील पंकज कपूर, सावत्र आई सुप्रिया पाठक, सावत्र भाऊ रुहान, मित्रपरिवार आणि अन्य नातेवाईक अगोदरपासूनच ओबेरॉय हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या पंचतारांकित हॉटेलमध्येच पाहुण्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. दिल्लीत लग्न पार पडल्यावर १२ जुलैला मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभाला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थिती लावणार असल्याचे समजते.
shaihdkapoor-smilesshahidkapoorphotos

Story img Loader