शाहिद आणि मीरा राजपूत हे दोघंही आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा गोड बातमी देणार असल्याच्या चर्चा बी टाऊनमधून दबक्या स्वरात का होईना पण ऐकायला मिळत आहेत. बी टाऊनमधल्या या जोडप्याच्या घरात दुसऱ्यांना पाळणा हलणार आहे अशी चर्चा सध्या वाऱ्याच्या वेगानं पसरली आहे. शाहिदची लाडकी मिशा दीड वर्षांची झाली आहे, हे दोघंही तिच्या संगोपनात व्यग्र आहेत. शूटिंगपासून जसा वेळ मिळतो तो वेळ शाहिद लाडक्या मिशासोबत व्यतित करतो.

‘इंडिया टुडे’च्या बातमीनुसार मीरा गर्भवती आहे. काही सुत्रांनी ही बातमी दिल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात या बातमीत तथ्य असल्याचंही म्हटलं जात आहे. कारण फार पूर्वीच मीरा आणि शाहिदनं दोन वेगवेगळया माध्यामांना दिलेल्या मुलाखतीत दुसऱ्या मुलासाठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. जीक्यू मासिकाला दिलेल्या मुलाखती शाहिदनं मीरा दुसऱ्या मुलासाठी प्लानिंग करत असल्याचं म्हटलं होतं. मीरा ही २२ वर्षांची आहे. तर दुसऱ्या एका मुलाखतीत मीरानं देखील दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग करत असल्याचं कबुल केलं होतं. दुसरं मुलं जन्माला आलं की नोकरी करायची की नाही याचा विचार करेन असं ती म्हणाली.

मीराचे बेबी बम्पसही दिसू लागल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मीरानं सैल पोषाख परिधान केला होता पण ती गर्भवती असल्याचं सहज लक्षात येत असल्याची माहिती काहींनी दिली. मीरा गर्भवती असल्याच्या शक्यता बॉलीवूडमध्ये चर्चील्या जात असल्या तरी या जोडप्यानं मात्र अधिकृतरित्या मात्र या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

Story img Loader