दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या काश्मीरमध्य सुरु आहे. मात्र, काश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निषेध केल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे लागले.
‘हैदर’ चित्रपटाच्या सेटवर असलेल्या तिरंग्याला आक्षेप घेत काश्मीतरमधील विद्यार्थी संघटनांनी चित्रीकरण बंद पाडले. तसेच, चित्रपटातील कलाकारांचा निषेध करत या संघटनांनी भारतविरोधी आणि स्वातंत्र्याच्या घोषणाही दिल्या. गेल्या दोन आठवड्यांपासून विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’ या चित्रपटाचे शुटिंग श्रीनगरमध्ये सुरू होते. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चे हे भारतीय रूपांतर आहे. या चित्रपटाची कथा काश्मीर खो-यातत घडते, असे ‘हैदर’मध्ये दाखविण्यात येणार आहे.
चित्रीकरणासाठी विद्यापीठ परिसरामध्ये भारतीय लष्कराच्या तळाचा सेट उभारण्यात आला होता, त्यावर तिरंगाही होता. विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकविण्यावर आक्षेप घेतला. सुरवातीला पोलिसांनी दोघांना अटक करून निदर्शकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळामध्ये शुटिंग होऊ शकले नाही. त्यातच, अभिनेता इरफान खान धूम्रपान करत असल्याचाही निदर्शकांच्या एका गटाने निषेध केला. चित्रपटातील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला या प्रसंगाचे चित्रीकरण विद्यापीठ परिसरामध्ये केले जाणार होते; पण निदर्शनांमुळे आणि सर्व प्रकरणामुळे विशाल भारद्वाज यांनी चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा