सामान्य माणूस असो किंवा कितीही मोठा सुपरस्टार असो, स्वत:चे घर हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरही सध्या याच गोष्टीचा अनुभव घेत आहे. ‘हैदर’ या चित्रपटातून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची वाहवा मिळवणारा शाहीद नुकताच पोलंडहून परतला आहे. पोलंडला तो विकास बहल दिग्दर्शित ‘शानदार’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गेला होता. मात्र, तेथून परतल्यानंतर शाहीद त्याच्या रोजच्या कामातून वेळ काढून इन्स्ट्राग्रामवर स्वत:च्या नव्या घराची छायाचित्रे टाकताना दिसत आहे. समुद्राच्या काठावर असणारा शाहीदचा हा बंगला येत्या काही महिन्यांतच तयार होणार आहे. त्यामुळे त्याने आत्तापासूनच ‘लाईफ अंडर कन्स्ट्रक्शन’ (#LifeUnderConstruction) या टॅगअंतर्गत इन्स्ट्राग्रामवर बंगल्याच्या सुरू असलेल्या कामाची छायाचित्रे टाकण्यास सुरूवात केली आहे.

यापूर्वी अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील इमारतीमध्ये वेगवेगळ्या मजल्यावर तो आणि त्याचे वडील पंकज कपूर राहत होते. मात्र, आता येथून बाहेर पडून प्रशस्त अशा बंगल्यात राहायला जाण्याचे वेध शाहीद कपूरला लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा