बॉलीवूडची भाऊ-बहिणीची जोडी म्हणजे शाहिद आणि सनाह कपूर हे एकत्र चित्रपटात झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. शाहिद सध्या आपल्या आगामी ‘हैदर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त  आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच तो ‘शानदार’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून, या चित्रपटाद्वारे त्याची लहान बहिण सनाह कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल.
वडिल पंकज कपूर आणि बहिण सनाहसोबत चित्रपट करण्यास आपण उत्सुक असल्याचे शाहिदने सांगितले आहे. मात्र, चित्रपटातील सनाहच्या भूमिकेबाबत त्याने बोलणे टाळले. तथापि, चित्रपटात सनाह ही आलियाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तविली जात असून, पंकज कपूर हे तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. सनाहने न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘ली स्टार्टबर्ग थेटर अॅण्ड फिल्म इन्सिट्यूड’मधून अभिनयाचा धडे घेतले आहेत.

Story img Loader