बॉलीवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरच्या लग्नाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या ७ जुलै रोजी शाहिद बोहल्यावर चढणार आहे. रंगतदार विवाह सोहळा न करता छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाहिदच्या जवळच्या मित्रांपैकी एकाने दिली आहे. शाहिदचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा होणार असल्याचे समजते. छोटाखानी विवाह सोहळा असावा अशी शाहिद आणि मिरा या दोघांच्या कुटुंबियांची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बोहल्यावर चढण्यापूर्वी शाहिदने ग्रीसला जाण्याचे ठरवले होते. मात्र, कामात व्यस्त असलेल्या शाहिदला त्याची बॅचलर ट्रीप रद्द करावी लागली. त्यामुळे, निराश झालेल्या आपल्या मित्रांना वर्षाअखेर ट्रीपला जाण्यास शाहिदने पटवले असल्याचेही समजते.

Story img Loader