बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी शानदार चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास तिची पत्नी मीरा राजपूतने व्यक्त केला आहे. शाहिदच्या आगामी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग पाहिल्यानंतर त्याची पत्नी मीरा राजपूत हिने चित्रपटाचे ‘शानदार’ कौतुक केले. शाहिदचा शानदार चित्रपट त्याच्या आजवरच्या चित्रपटांपैकी सुपरहिट चित्रपट ठरेल, असे मीराने सांगितले. तसेच चित्रपटात शाहिदच्या लूकने आपल्याला भुरळ घातल्याचेही ती म्हणाली.
शानदार चित्रपट हा चित्रिकरणापासूनच बराच चर्चेत राहिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱया या चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader