डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवाच्या आगामी ‘आर… राजकुमार’ चित्रपटातील ‘गंदी बात’ गाण्याच्या व्हिडिओला तीन दिवसात चक्क दहा लाख ‘हिट्स’ मिळाले आहेत.
या गाण्यात प्रभू देवा आणि शाहिदचा डान्सिंग तडका पाहायला मिळतो आणि डान्स संदर्भातील ‘फाड दुंगा, आग लगा दुंगा’ या विशेषणांचा अर्थ लागतो. ‘पेपी’ प्रकारातले हे गाणे तरूणवर्गात चर्चिले जात आहे. गाण्यात सोनाक्षी सिन्हाने आपली मादक अदाकारी पेश केली आहे, तर शाहिदचे रांगडे रूप पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शाहिद आणि सोनु सूदबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मीसुद्धा थिरकताना दिसते. या गाण्याला प्रितम यांनी संगीत दिले असून मिका सिंग आणि कल्पना पटोवरी यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याचे अनावरण प्रसिद्ध रियालिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर करण्यात आले. ‘आर… राजकुमार’ हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात चित्रपटगृहात झळकणार आहे.
पाहा : शाहिदच्या ‘गंदी बात’ गाण्याचा व्हिडिओ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा