शाहिदच्या आगामी ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटातील ‘तु मेरे अगल बगल’ गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. शाहीद आणि इलयाना डीक्रूझवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात टपोरी वेशात असलेला शाहीद रागावलेल्या इलयानाचा पाठलाग करताना दिसतो. ‘खालीपिली खालीपिली टोकनेका नही, तेरा पिछा करु तो रोखनेका नही…’ अशा टपोरी भाषेत गाण्याचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. गाण्याचे चित्रिकरण धोबीघाट आणि कोळी वातावरणात करण्यात आले आहे. प्रितमचे संगीत असलेले हे गाणे मिका सिंगने गायले आहे.
रमेश तौरानी, सिद्धार्थ रॉय कपूर आणि रॉनी स्क्रुवाला यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader