बिग बॉसच्या विक एन्ड एपिसोडमध्ये इमरान खान आणि करीना कपूर गोरी तेरे प्यार मै चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता गेले होते. त्यावेळी शाहरुख खान हा आपला मित्र असल्याचे दबंग सलमानने स्वतः म्हटले.
काही दिवसांपूर्वी सलमानचे वडिल सलीम खान यांनी सलमान आणि शाहरुखमध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाही. ते दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत असे म्हटले होते. त्यामुळे शाहरुखशी मैत्री असल्याचे सलमानच्या तोंडून निघालेले हे शब्द सर्वांना धक्का देणारे ठरले. यावर्षी काँग्रेस नेता बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये या दोन्ही खानांनी गळाभेट केली होती.
२००८ सालापासून या दोघांमध्ये वैर आहे. कतरिनाच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यात भांडण झाले होते. पण, त्यानंतर हे शाहरुख-सलमान समोरासमोर येऊनही त्यांच्यातील दुरावा कायम राहिला.

Story img Loader