बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आलिया सध्या शाहरुखसोबत काम करायला मिळालं यामुळे भलतीच खुष आहे. पण नेमकी असं काय झालं की शाहरुखने आलियाला गुडघ्यांवर बसायला सांगितले..
याच्या आधी तुम्ही अजून काही विचार कराल, तर आधीच सांगतो की, रेड चिलीज एण्टरटेनमेन्टने यूट्यूबवर सिनेमाच्या टीझरचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया शाहरुखला म्हणते की, ती त्याची काही मदत करु शकते का? यावर शाहरुख तिला रागाच्या स्वरात म्हणतो की तिकडे जाऊन गुडघ्यांवर उभी रहा. आलिया त्याचे हे रुप बघून खरंच तशी बसायलाही जाते. पण त्यानंतर सगळे हसायला लागतात. तेव्हा तिला कळते की ती एक मस्करी आहे.
व्हिडीओमध्ये शाहरुख आणि आलियासोबतच सिनेमाशी निगडीत इतर कलाकारही तो संपूर्ण प्रवास एन्जॉय करताना दिसत आहेत. गौरी शिंदे हिच्या दिग्दर्शनात बनलेला ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा आयुष्यातल्या उतार चढावावर भाष्य करतो. या सिनेमात शाहरुख आणि आलियासोबत अंगद बेदी आणि कुणाल कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
डिअर जिंदगीमध्ये शाहरुख जहांगीर आणि आलिया कायरा या व्यक्तिरेखा साकारत आहेत. या सिनेमात शाहरुख आलियाचा गुरु दाखवण्यात आला आहे. या २५ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखसोबतचा आलियाचा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी ती फार उत्सुक आहे.