आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला अडचणींना सामोरं जावं लागत आहे. बायजूसने शाहरुख खान सोबतचे सर्व प्रमोशन्स सध्या बंद केल्याची चर्चा होती. तसेच बायजूसच्या जाहिराती तात्पुरत्या बंद केल्या होत्या. मात्र या जाहिराती पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शाहरूख आणि बायजूस कराराबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. टी २० वर्ल्डकप सामने आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमावेळी शाहरुख खानच्या जाहिराती पुन्हा एकदा झळकू लागल्या आहेत.
“जाहिराती बंद करणं एक व्यावसायिक निर्णय होता. मात्र करार वैध आहे आणि तो तसाच सुरु राहिल. या जाहिराती ठरल्याप्रमाणे टी २० विश्वचषकादम्यान सुरु राहतील. जाहिराती ४ ते ५ दिवसांसाठी ऑफएअर करण्यात आल्या होत्या”, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मनी कंट्रोलने वृत्त दिलं आहे. २०१७ सालापासून शाहरुख खान बायजूस या लर्निंग ॲपचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. यासाठी शाहरुख खानला प्रतिवर्षी तीन ते चार कोटी रुपयाचं मानधन मिळत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
तुरुंगामधील टॉयलेट वापरावं लागू नये म्हणून…; आर्यन खानमुळे तुरुंग कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं
एडटेक स्टार्टअप या कंपनीला गेल्या काही दिवसात ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या ट्रॉलिंगचा सामना करावा लागला होता.यानंतर त्यांनी जाहिरातींसाठी ॲडव्हान्स बुकिंग होऊन देखील शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ट्विटरवर ‘बॉयकॉट बायजू’चा ट्रेंड सुरू झाल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शाहरूखच्या चाहत्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर निर्णय मागे घेतल्याचं बोललं जात आहे. बायजूस टी २० विश्वचषकाचा एक प्रायोजक आहे.