शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण आता ‘शतकोटी’ झाले असून सलग पाच चित्रपटांतील यशामुळे दोघांनाही ‘१०० कोटी’ क्लबमध्ये स्थान मिळाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटानेही अवघ्या तीन दिवसात ‘१०० कोटी’ क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
शाहरुख आणि दीपिका पदुकोण हे २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र आले आणि ही जोडी हीट झाली. आता सात वर्षांनंतर ही जोडी ‘हॅप्पी न्यू इअर’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आली आहे. सलग पाच चित्रपट ‘१०० कोटी’ क्लबमध्ये सामील करून शाहरुख आणि दीपिकाने बॉलिवूडमध्ये आगळा विक्रम केला असल्याची जोरदार चर्चा आहे.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘रा-वन’ चित्रपटाने ‘१०० कोटी क्लब’मध्ये जागा मिळविली होती. त्यानंतर शाहरुखचे ‘डॉन-२’, ‘जब तक हैं जान’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हे चित्रपटही चांगले चालले. या सर्व चित्रपटांनी शाहरुखला ‘१०० कोटी’क्लबचे सदस्यत्व मिळवून दिले आणि आता यंदा प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी न्यू इअर’ने ही विक्रम केला आहे.
दीपिका पदुकोणचेही सलग पाच चित्रपट ‘१०० कोटी’ क्लबमध्ये आले आहेत. ‘हॅप्पी न्यू इअर’ अगोदर ‘गोलियों की रासलिला-रामलिला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘ये जवानी हैं दिवानी’ आणि ‘रेस-२’ हे चित्रपट ‘१०० कोटी’ क्लबमध्ये सहभागी झाले होते. शाहरुखचा ‘बॅण्ड बाजा बारात’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्माचे आहे. तर दीपिका पदुकोणचे ‘पिकु’ आणि ‘तमाशा’ हे दोन चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. या दोघांच्या अगोदरच्या सलग पाच चित्रपटांप्रमाणे हे चित्रपटही ‘१०० कोटी’क्लबचा हिस्सा बनणार का? याकडे बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा