मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅन’ चित्रपटात शाहरूखने एका सुपरस्टार आणि फॅनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सुपरस्टार आपल्यासारखा नाही. उलट, गौरवसारखं कोणाचं तरी फॅन होणं आपल्याला आवडलं असतं, असं शाहरूखने सांगितलं. मात्र तरुणपणी वेडय़ासारखं कुणाचं तरी फॅन होऊन त्याचे चित्रपट पाहण्याएवढा वेळच आपल्याला मिळाला नाही. ‘फॅन’ होण्याआधीच मी ‘स्टार’ झालो होतो, असं त्याने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘फॅन’ या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा देताना तरुणपणी आईवडील गेल्यामुळे फार लहान वयात मोठी जबाबदारी आपल्यावर पडली. त्यामुळे ‘फॅन’ होण्याची मौजमजा अनुभवण्याएवढा वेळच मिळाला नाही, असं तो म्हणतो. ज्या वयात खेळ, चित्रपट या गोष्टींमागे धावायचं असतं त्या वयात मी काम करत होतो. मलाही व्हिडीओ गेम्स खेळायचे होते, खेळात प्रावीण्य मिळवायचं होतं; पण अशा अनेक गोष्टी राहून गेल्या, असं शाहरूखने सांगितलं. या चित्रपटात पन्नास वर्षांच्या शाहरूखला एकाच वेळी त्याच्या वयाचा सुपरस्टार साकारणं आणि पंचवीस वर्षांचा तरुण गौरव साकारणं या दोन्ही गोष्टी फार अवघड गेल्या. मला लोकांचं निरीक्षण करायला आवडतं. त्यामुळे अशा निरीक्षणातून तरुण मुले कशी चालतात, कशी बोलतात, कसे वागतात या गोष्टी मला सहज लक्षात येणाऱ्या आहेत; पण गौरवसाठी म्हणून प्रॉस्थेटिक मेकअप केल्यानंतर मी खरा वाटेन का इथपासून मनात शंका होती. तरुण वाटावं म्हणून माझी उंचीही कमी करण्यात आली होती. या सगळय़ाचा दृश्य परिणाम नेमका माहीत नसल्यामुळे लुक आणि अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं अवघड गेल्याचं शाहरूखचं म्हणणं आहे. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहात लहानाचे मोठे झालो असल्याने त्यांचा, धर्मेद्र आणि दिलीपकुमार यांचे आपण फॅन होतो, असं त्याने सांगितलं. खेळाचीही पहिल्यापासून आवड असल्याने मिल्खा सिंग, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, पीटर सेलार्स असे अनेक खेळाडूही एकदम आवडत होते. मात्र प्रत्येकामागे धावणं कधी जमलं नाही, असंही तो सांगतो. आत्ताही सुपस्टार म्हणून अनेकविध प्रकारच्या चाहत्यांशी संबंध येतो; पण चित्रपटातील गौरवप्रमाणे इतका वेडा चाहता कधी अनुभवलेला नाही. मात्र आपण कधीही चाहत्यांपासून दूर राहू शकत नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. मी एकटा राहू शकत नाही. माझं अर्ध आयुष्य कोणी तरी माझ्यावर प्रेम करावं म्हणून धडपडण्यात गेलं आहे. त्यामुळे चाहत्यांचे प्रेम ही माझ्यासाठी पर्वणी आहे, असं त्याने सांगितलं. शाहरूखने आपल्या चित्रपटांची रिळेही गोळा केली आहेत. मी जेवढे चित्रपट केले आहेत त्यावर माझी मालकी असावी असे मला वाटते. त्यामुळे चित्रपटाच्या निगेटिव्हज मिळत आहेत हे कळले की मी ते लगेच विकत घेतो. मला हे सगळं माझ्या मुलांना भेट द्यायचं आहे. शाहरूखकडे त्याच्या आधीच्या ‘इंग्लिश बाबू देसी मेम’, ‘चाहता’ अशा चित्रपटांचेही निगेटिव्हज आहेत. मुलांची बेडरूम ही घरातील आपली आवडती जागा असल्याचं त्याने सांगितलं. तिथेही कुणी आपल्याला प्रश्न विचारत नाहीत. तिथे मी मला जे हवं वाटेल ते करू शकतो, असं सांगणारा शाहरूख आता ‘फॅन’नंतर आगामी ‘रईस’ चित्रपटाकडे वळला आहे.